श्रमिक मुकती दलाचा 5 रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

 

स्थैर्य, सातारा दि.३: श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने हाथरसमधील घटनेच्या निषधार्थ 5 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशामध्ये घडलेल्या या भयंकर घटनेच्या बाबतीत सर्व कष्टकरी स्त्री पुरुष जनतेने 5 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता आपापल्या घरासमोर बसून आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो गावे सहभागी होणार आहेत अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी दिली, हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ डॉ भारत पाटणकर यांनी दिली .

फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधताना डॉ पाटणकर पुढे म्हणाले मनीषा वाल्मिकी या उत्तरप्रदेश मधील हाथरस मधील मुलगी होती. तिचा समाज कोणताही असला तरी ती स्त्री होती, परंतु ती ज्याला पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज समजले जात होते ते आजही उत्तरप्रदेश सह सगळीकडे समजतात. आशा समाजातील मुलगी होती वाल्मिकी अडणावरून हे स्पष्ट होते .

तिच्यावर हल्ला झाला. त्या आधी तिचा पाठलाग होत होता. त्यामध्ये तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. त्या नंतर तिची जीभ कापली आणि तिला फेकून दिले हे कृत्य गावातील धनदांडगे आणि जात धांडगेलोक होते त्यांनीच हे केले आहे. चर्चा ह्या सुरू आहेत की दलित असो वा मराठा, माळी धनगर, की अन्य जातीतील ज्या जातीच्या लोकांवर हल्ला झाला की तो समाज आंदोलन करणार का. आशा पध्दतीने जो प्रकार चालू आहे तो हीच स्वतःच्या कष्टयातून निर्माण करणारी जनता आहे. जिचे शोषण होतंय त्यामध्येच फूट पडायची व त्यातून वेगवेगळे ठेवले जाणाऱ्या शत्रूचा प्रकार आहे यापूर्वी श्रमिक मुक्ती दलाने कोणत्याही समाजावर अन्याय झाला तर संपूर्ण जाती धर्मातील लोकांना घेऊन निषेध मोर्चा सर्व जातीतील मोठया संख्येने लोक एकत्र येऊन जातीच्या आतांची लढाई व चळवळ केली आहे ज्याला सवर्ण समजले जाते असे हजारो लोक यामध्ये सामील होऊन आंदोलन करत असतात .

हा प्रयत्न श्रमिक मुक्ती दलाने अनेक वर्षे व आताही श्रमिक मुक्ती दल ची भूमिका अशीच आहे आताही श्रमिक मुक्ती दलाचे म्हणणे असे आहे की सर्वांनी बाकी चर्चा थांबवावी आणि राज्यभर देशभर सोशल मीडिया तुन निषेध करावेत पण हे करत असताना गावागावतील जनता लढली पाहिजे त्यांनी केलेतरी म्हणले पाहिजे त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे कारण हे हिथे थांबत नाही तर हाथरस मध्ये झाले त्यानंतर बलरामपुर इत्यादी घटनेच्या निषेधार्थ 5 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेकडो गावे सहभागी होणार आहेत 

महाराष्ट्र च्या खैरलांजी पासून ते इंदिरा गांधी यांनी ज्या बिहार या ठिकाणी बेलची या गावी गेल्या होत्या त्याला जवळपास 35 -40 वर्ष हुन अधिक कालावधी गेला अशी सर्व उदाहरणे आहेत आणि असे प्रकार वाढत चालले आहेत .अशा वेळेला प्रकार का चालू राहतात तर गावागावातील सर्व समाजातील स्त्री पुरुष एकत्र येऊन जाब विचारत नाहीत विचारण्यासाठी येत नाही त्यामुळे या पद्धतीने करून खेड्या पाड्यातील लोक आहेत त्यांनी आपली जात बघणार नाहीत धर्म बघणार नाही आम्ही अत्याचार थांबवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका घेऊन एक नवीन दिशा घेण्याचे आवाहन करत आहे अशी भूमिका श्रमिक मुक्ती दलाने घेतली आहे

त्याच बरोबर या आंदोलनात मोठया संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन डॉ भारत पाटणकर वाहरू सोनवणे, संपत देसाई डॉ प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी कृष्णा पाटील संतोष गोटाल मोहन आनपट सुखदेव बन, राजन भगत, डी.के. बोडके. अंकुश शेडगे, दिलीप गायकवाड .मारुती पाटील .सह सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.
Previous Post Next Post