राजकारणासाठी समाज्याचा वापर करणाऱ्यानं पासून दूर रहा - अशोक माने - धनगर आरक्षणाची ही धग वाढते आहे, मात्र नेत्यांचे दुर्लक्ष |

 

स्थैर्य, म्हसवड, दि.१: धनगर समाज्याचा आरक्षणाचा प्रश्न घोळवत ठेवणाऱ्या नेत्यांच्या मागे समाज्याने का ऊभे राहावे असा सवाल करीत फक्त राजकारणासाठी धनगर समाज्याचा वापर करणाऱ्या नेत्यांचे मागे जाऊ नका असा गर्भित इशारा अशोक माने, डॉ. संदीप घुगरे व धनगर समाज करीकर्त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे

स्वातंत्र्य मिळाल्यापासुन धनगर समाजाला आरक्षणापासुन वंचीत ठेवले गेले आहे समाजाच्या जीवनमरणाचा प्रश्न असतानाही सतत राजकारण केल जातयं, भिक दिल्यासारखे सत्तेचा तुकडा राजकीय पक्ष देतायत, राज्यात २ नंबरचा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहीले जातयं परंतु समाजाचे नेते विखुरलेले आहेत, ते या समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी एकत्र यायला तयार नाहीत त्यामुळे आता समाजाला हा प्रश्न पडला आहे की या नेत्यांना प्रश्न सोडवायचा आहे की चिघळत ठेवायचा आहे, कारण आतापर्यंत धनगर समाज्याचे आमदार ,मंत्री, विविधराजकीय पक्षाचे प्रमुख नेतेपद अनेकांनी भूषविलेले आहे समाजाची फसवणूक नेमक कोण करतय राजकीयनेते..? सरकार..? की समाजाचे नेते. ?

स्वर्गीय बी के कोकरेंपासुन आतापर्यंत आरक्षणासाठी खुप आंदोलने झाली परंतु नेते काही या प्रश्नावर एकत्र येत नाहीत. आजच्या घडीला आदरणीय आण्णासाहेब डांगे, गणपतराव देशमुख, विकास महात्मे, अनिल गोटे, प्रकाश शेंडगे, राम शिंदे, दत्ता भरणे, गोपीचंद पडळकर, रामहरी रूपनवर, रामराव वडकुते, महादेव जानकर, रमेश शेंडगे, आण्णाराव पाटील, आनंदराव पाटील, शिवाजीराव देणे, शशिकांत तरंगे आणी इतर युवा नेते ही आहेत या सर्वांनी आपला इगो बाजुला ठेऊन या प्रश्नावर एकत्र यावे ही समस्त महाराष्ट्रातील धनगर समाजाची मागणी आहे, परंतु या नेत्याचा इगो आडवा येतोय, तसेच यांचे राजकीय पक्षाचे बोलवते धनी आडवे आहेत. 

आता समाजाने हे नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत यांच्या ऊभे राहाणे बंद करावे आणि आरक्षणासाठी स्वतंत्र लढा उभा करण्याचा प्रयत्न करावा मग हे नेते जाग्यावर येतील. काही नेते सांगतायत आरक्षणाची अंमलबजावणी करा तर काही सांगतायत राज्य सरकारने केंद्र सरकार ला शिफारस करावी आणि केंद्र सरकारने आरक्षण लागू करावे. परंतु घटनेने दिले हे आरक्षण इतर राज्यातील धनगर समाजाला लागू झाले आहे मग महाराष्ट्र राज्य घटनेची अंमलबजावणी का करत नाही हा समाजा पडलेला प्रश्न आहे. आणि याच प्रश्नावर नेते समाजाला फसवत आहेत की काय तेच कळत नाही. 

अशोक माने, डॉ.संदीप घुगरे, संदिप काळे, विष्णू गोरे, प्रकाश खाडे, गणेश कोकरे , आबा बंडगर, बाबासाहेब मानले, संतोष वाघमोडे, रोहीत पांढरे, जगदीश वीर, प्रकाश देवकाते व इतर समाज बांधवानी विचार व्यक्त केले आहेत.

Previous Post Next Post