‘शरयु’चा बॉयलर अग्निप्रदीपण सोहळा उत्साहात संपन्न 

 

स्थैर्य, फलटण दि.१३: यंदा सुदैवाने ऊसाचे क्षेत्र मुबलक आहे. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांनी एकजुटीने काम करून कारखान्याचे ठरविलेले 10 लाख मेट्रीयक टन गळीताची उद्दिष्टपूर्ती करावी, असे आवाहन शरयु अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लि;चे संचालक युगेंद्र उर्फ दादासाहेब पवार यांनी केले.

कापशी, ता.फलटण येथील शरयु ऍग्रो इंडस्ट्रीजच्या 6 व्या बॉयलर अग्निप्रदीपण समारंभावेळी ते बोलत होते. प्रारंभी युगेंद्र पवार यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपण करण्यात आले.
प्रारंभी संचालक अविनाश भापकर यांनी सपत्नीक अग्नी पूजा केली. कार्यक्रमास सर्व वरिष्ठ विभाग प्रमुख उप-प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, कारखान्याचे चेअरमन श्रीनिवास पवार, शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिला पवार, कार्यकारी संचालक अमरसिंह पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून लवकरच गळीत हंगाम सुरू होणार आहे. या गळीत हंगामात दहा लाख मे टन गळीताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आवश्यक वाहतूक यंत्रणा सज्ज झाली आहे.Previous Post Next Post