पाच चॅनलवर केस दाखल, सर्वांकडून पाच वर्षांच्या खात्याचा तपशील मागवण्यात आला; या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक

 

स्थैर्य, दि.२३: फेक टीआरपी केसमध्ये मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच इंटेलिजेंस यूनिटने आतापर्यंत 5 चॅनलविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या सर्व चॅनलला पाच वर्षांचे अकाउंड डिटेल मागवण्यात आले आहेत. क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या चॅनलच्या अकाउंट्सच्या तपासात आर्थिक अनियमितता आढळली आहे. या सर्व वाहिन्यांचे मालक आणि त्यांचे वित्त विभाग यांना गेल्या पाच वर्षांच्या खात्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 लोकांना अटक करण्यात आली आहे.

चौकशीत आणखी दोन वाहिन्यांची नावे आली समोर
8 ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत बनावट टीआरपी खरेदी करण्याचा खेळ उघडकीस आणला होता. त्यावेळी तीन वाहिन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाचा समावेश होता. या प्रकरणात अटक केलेले आरोपी विश्वकर्मा आणि रामजी वर्मा यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत आणखी दोन वाहिन्यांची नावे समोर आली आहेत. मात्र पोलिसांनी त्याचे नाव उघड केले नाही. परंतु, त्यामध्ये एक न्यूज चॅनेल आणि म्यूझिक चॅनेल देखील आहे.

रिपब्लिकच्या बर्‍याच लोकांची चौकशी केली गेली आहे
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन वाहिन्यांच्या संचालकांना अटक केली आहे. त्याच वेळी रिपब्लिक टीव्हीच्या 6 हून अधिक लोकांची चौकशी केली गेली आहे. 24 ऑक्टोबर रोजी चॅनेलचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्याम सिंह आणि कार्यकारी संपादक निरंजन स्वामीची गुरुवारी चौकशी करण्यात आली. रिपब्लिक टीव्हीवर दाखवलेल्या हंसा वाहिनीच्या अहवालावरही गुन्हे शाखेने स्वामींना सवाल केले. गेल्या वेळी चौकशीमध्ये निरंजन स्वामी यांनी हंसाचा तो रिपोर्ट मागितला होता.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya