फलटण शहरात कोरोना रुग्णांसाठी एकूण २९६ बेड असून त्यापैकी ९० उपलब्ध

 

स्थैर्य, फलटण दि. ३ : फलटण शहर व तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांसाठी शहरातील खाजगी हॉस्पिटल्स, शासकीय रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून दि. २ ऑक्टोबर रोजी उपलब्ध असलेले आयसीयू, ऑक्सिजन व जनरल बेडची संख्या २९६ आहे. त्यापैकी २०६ बेड रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात आले असून ९० बेड उपलब्ध असल्याची माहिती इंसिडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

आयसीयू ३९, ऑक्सिजन ८८, जनरल १६९ पैकी ९० उपलब्ध

त्यापैकी आयसीयू सुविधेचे ३९ बेड असून या सर्व बेडवर रुग्ण दाखल असल्याने एकही बेड उपलब्ध नाही. या ३९ पैकी ५ उप जिल्हा रुग्णालय, १५ निकोप हॉस्पिटल, ५ श्रीमंत मालोजीराजे रौप्य महोत्सव रुग्णालय (लाइफ लाइन हॉस्पिटल), ७ सुविधा हॉस्पिटल, ७ साई हॉस्पिटल असे आहेत.

ऑक्सिजन सुविधेचे २० बेड उपलब्ध

ऑक्सिजन सुविधेचे ८८ बेड असून त्यापैकी २३ उप जिल्हा रुग्णालय, २० लाईफ लाइन, १७ सुविधा हॉस्पिटल, ८ साई हॉस्पिटल, २० हणमंतराव पवार हायस्कूल (छत्रपती शिवाजी महाराज कोरोना उपचार केंद्र). ८८ पैकी ६८ वर रुग्ण दाखल असून २० उपलब्ध होते.

जनरल ७० बेड उपलब्ध

जनरल बेड १६९ असून त्यापैकी ७ उप जिल्हा रुग्णालयात, २१ लाईफ लाइन, १२ सुविधा हॉस्पिटल, १२ साई हॉस्पिटल, २० हणमंतराव पवार हायस्कूल (छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर), ४२ श्रीमंत मालोजीराजे शेती शाळा (विद्यार्थी वसतीगृह), ५५ श्रीमंत मालोजीराजे शेती शाळा (विद्यार्थिनी वसतिगृह). १६९ पैकी ९९ वर रुग्ण दाखल असून ७० बेड उपलब्ध होते.

रेमडीसीवर २०२ इंजेक्शन्स उपलब्ध

दि. २ ऑक्टोबर रोजी फलटण शहरातील विविध खाजगी हॉस्पिटल्स, औषध विक्रेते यांचेकडे रेमडीसीवीर इंजेक्शन २०२ शिल्लक होती अशी माहिती इंसिडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya