वन विभागाला आढळले पोटा मध्ये भुसा भरून दोऱ्याने शिवलेले दोन शेळीच्या करडांचे भोद

 


स्थैर्य, फलटण, दि.३ : फलटण दहिवडी रोड येथे असणाऱ्या गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जवळ वन विभागाला दोन शेळीच्या करडांचे भोद आढळून आलेली आहेत. सदर भोदाच्या पोटा मध्ये भुसा भरून सदर भोद हे दोऱ्याने शिवलेले आहेत. त्यामुळे ते हरणासारखे दिसत असून त्यांची शिंगे ही सायकलच्या ट्यूब पासून तयार केलेली आहेत व सदरील भोद हे कोणालातरी मुद्दाम नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने केले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे अशी माहिती फलटण परिक्षेत्राचे वनअधिकारी मारूतीराव निकम यांनी दिली.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya