मुख्य संशयित वनपाल गावित यास बोरगाव पोलिसांकडून अटक

 


 स्थैर्य, नागठाणे, दि. २६ : शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पिरेवाडी (ता.सातारा) येथुल युवकाकडून पंचवीस हजार रुपये  खंडनीप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या चार वनकर्मचार्यांपैकी मुख्य सूत्रधार वनपाल योगेश पुनाजी गावित याला बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले.यापूर्वी वनसंरक्षक महेश सोनवले या वनकर्मचाऱ्याला अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे.अजून दोन वनसंरक्षक पोलिसांना गुंगारा देत आहेत.


पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती.याची तक्रार ओंकार शिंदे याने ५ सप्टेंबरमध्ये बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती.पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित,वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले,रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते. 


यापैकी वनसंरक्षक महेश सोनवले याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती.सध्या तो पोलीस कोठडीत आहे.सोमवारी सायंकाळी पोलिसांनी पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख वनपाल योगेश गावित याला ताब्यात घेतले.या खंडणीप्रकरणातील अन्य दोन वनसंरक्षक रणजित व्यंकटराव काकडे व किशोर ज्ञानदेव ढाणे हे पोलिसांना गुंगारा देत आहेत.



वनसंरक्षक सोनवलेच्या कास्टडीत वाढ

खंडणीप्रकरणातील वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले याला दि.२२ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.त्याला जिल्हा न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास स पो नि डॉ. सागर वाघ करत आहेत.




Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya