जबरी चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा

 

स्थैर्य, सातारा, दि.९: लिंब, ता. सातारा येथे गौरीशंकर कॉलेजसमोरील सेवारस्त्यावर इको गाडीला गाडी आडवी मारून दोनजणांनी जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, विश्‍वजीत शंकर फरांदे रा. आनेवाडी हे इको गाडीने जात होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी आडवी गाडी मारून त्यांना थांबवली. तुझ्याकडे औषध वाहतूक करण्याचा परवाना आहे अशी विचारणा करत जबरदस्तीने खिशातील 10 हजारांचा मोबाईल काढून घेवून निघून गेले. याप्रकरणी उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya