बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक - ना.अस्लम शेख

 

स्थैर्य, मुंबई, दि.३०: बाबरी मशीद खटल्याचा निकाल हा अत्यंत धक्कादायक व अनपेक्षित असल्याचं मत मुंबईचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.

ना. अस्लम शेख म्हणाले की,बाबरी मशीद पाढण्यासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून एक राष्ट्रव्यापी मोहिम छेडण्यात आली होती. काही लोक मशित पाडण्यासाठी सोबत औजारेसुद्धा घेऊन गेले होते.अनेक वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांनी पुराव्यांसह या घटनेचं वार्तांकनही केलं होतं. असं असताना अशा प्रकारचा निर्णय येणं अनपेक्षित आहे.

सीबीआय साक्षीदार व पुरावे देण्यात कमी पडलं. यापुढे तरी देशात अशा प्रकारची देशाच्या एैक्याला तडा जाईल अशी घटना घडू नये यासाठी देशातील सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी दक्ष असायला हवे असं मत ना. शेख यांनी शेवटी व्यक्त केलं.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya