चंदनाचे झाड चोरीस

 


स्थैर्य, सातारा, दि.७: एमआयडीसी, सातारा येथून चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरून नेले. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरीष जयवंत शहा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी येथे शहा यांच्या फ्लॅटजवळ 5 फूट लांबीचे व 8 इंच जाडीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी हवालदार गायकवाड तपास करत आहेत.