ट्रेन सुरू होणार : रेल्वेने दिली 39 नवीन विशेष गाड्या सुरू करण्यास मंजूरी; यातील 5 एक्सप्रेस महाराष्ट्रात धावणार, लवकरच वेळापत्रक जाहीर होईल

 स्थैर्य, दि.८: रेल्वे बोर्डाने बुधवारी 39 नवीन ट्रेन सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. या विशेष ट्रेन म्हणून सुरू होतील. या नवीन ट्रेनसाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. 39 पैकी 26 ट्रेन स्लीपर आणि 13 सिटिंग असतील. नुकतच रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले होते की, फेस्टिव सीजनमध्ये 15 ऑक्टोबरत ते 30 नोव्हेंबरदरम्यान 200 विशेष ट्रेन सुरू केल्या जातील.

तिकडे, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबईदरम्यान तेजस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन 17 ऑक्टोबरपासून सुरू होतील. कोरोना महामारीमुळे तेजस ट्रेन 19 मार्चपासून बंद आहेत. आयआरसीटीसीने म्हटले की, रेल्वे मंत्रालयाने या ट्रेन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या ट्रेनची बुकिंग लवकरच सुरू होईल.

सेंट्रल रेल्वे महाराष्ट्रात 9 ऑक्टोबरपासून 5 जोडी ट्रेन सुरू करणार

सेंट्रल रेल्वेने बुधवारी सांगितले की, 9 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पाच जोडी स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या जातील. यातील दोन ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि पुणेदरम्यान असतील. याशिवाय, एक-एक जोडी ट्रेन सीएसएमटी- नागपूर, सीएसएमटी-गोंदिया आणि सीएसएमटी-सोलापूर रुटवर चालतील.

39 नवीन ट्रेनची यादी