अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा - जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना ओदश

 

स्थैर्य, सातारा दि.१५: ऑक्टोंबर 2020 मध्ये अतिवृष्टी व परामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे.

शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबात बाधित शेतकऱ्यांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ,ब,क,क, ड मध्ये अहवाल सादर करावा. येणाऱ्या प्रस्तावामध्ये एकाच लाभार्थ्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा असल्याने अहवाल तात्काळ सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya