मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार आज स्वीकारलेले विजय गौडा यांचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून स्वागत

 

मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गौडा यांचे स्वागत करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व शेजारी विश्वास दादा गावडे

स्थैर्य, फलटण दि. ७: सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार आज स्वीकारलेले विजय गौडा यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य विश्वास दादा गावडे, उपस्थित होते.

जिल्हा परीषद मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांचेही श्रीमंत संजीवराजे यांनी विशेष अभिनंदन करुन स्वच्छता अभियान, कोरोना यासह त्यांनी केलेले कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत त्यांना धन्यवाद दिले
मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांचे अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर