टीसीएलकडून सनरायझर्स हैदराबाद टीमसोबत व्हर्चुअल ‘ग्रीट अँड मीट’चे आयोजन

 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता कंपनी आणि अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स कंपनी टीसीएलने सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या स्टार खेळाडूंसोबत व्हर्चुअल ग्रीट अँड मीट सत्राचे आयोजन केले. या उत्साहवर्धक व्हर्चुअल इव्हेंटद्वारे ब्रँडने डिजिटल क्षेत्रात आपली उपस्थिती दर्शवली. २५ टीसीएलच्या चाहत्यांना त्यांच्या सोशल अॅक्टिव्हिटीजद्वारे निवडण्यात आले व या मनोरंजक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली.

 

टीसीएलच्या विजेत्या चाहत्यांना टी२० एसआरएच टीमचे स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर, खालील अहमद, मनीष पांडे यांच्याशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमात सध्या सुरु असलेल्या सामन्यांवरील प्रश्नोत्तरांची फेरी खेळाडू आणि सहभागींमध्ये घेण्यात आली.

 

टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, 'मागील वर्षी आमच्या चाहत्यांना खेळाडूंशी वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी आम्ही दिली होती. पण या वर्षी टी२० भारताबाहेर होत असल्याने हे काम आव्हानात्मक होते. पण आमची परंपरा सुरु ठेवण्यासाठी आम्ही हे मीट अँड ग्रीट सत्र व्हर्चुअल पद्धतीने आयोजित केले. आमच्या चाहत्यांना अजूनही खेळाडूंशी संवाद साधण्याची संधी आहे. या सत्राद्वारे आमच्या चाहत्यांना त्यांच्या टीमला प्रोत्साहन दिल्याचा आनंद तर मिळेलच, शिवाय टीसीएल आणि त्यांच्यादरम्यान एक दृढ नाते तयार होईल, असा आम्हाला विश्वास आहे.'

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya