फलटणच्या लौकिकाला साजेशे काम करणार : तहसीलदार समीर यादव

 

स्थैर्य, फलटण, दि. २०: गेले अनेक महिने फलटणचे तहसीलदार पद रिक्त होते. त्या काळात निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांच्याकडे सदरील पदाचा पदभार देण्यात आलेला होता. परंतु नुकतीच काही दिवसांपूर्वी माझी नियुक्ती झाली असून फलटण तालुक्यातील सर्व जनतेला विश्वासात घेऊन फलटणच्या लौकिकास साजेशे काम आपण करणार असल्याची ग्वाही नूतन तहसीलदार समीर यादव यांनी दिली. 

फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाच्या वतीने तहसीलदार समीर यादव यांनी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी फलटण तालुक्याचे प्रश्न, समस्या व अडीअडचणी या बाबत पत्रकारांशी चर्चा केली. सदर चर्चेदरम्यान त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, दैनिक गंधवार्ताचे कार्यकारी संपादक रोहित अहिवळे, युवा जनमताचे संपादक युवराज पवार, दैनिक पुण्यनगरीचे फलटण तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे, दैनिक सकाळचे फलटण शहर प्रतिनिधी किरण बोळे, स्थैर्य लाईव्हचे संपादक चैतन्य रूद्रभटे, दैनिक ग्रामोध्दारचे फलटण तालुका प्रतिनिधी शक्ती भोसले, साप्ताहिक योद्धाचे संपादक मयुर देशपांडे, साप्ताहिक नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे आदींसह फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.