कोव्हिडच्या तीव्रतेचा चलन भागीदारीवर मोठा परिणाम

 

स्थैर्य, दि.२२: ऑगस्ट २०२० च्या सुरुवातीला यूरोयूएसडी (EURUSD) ही जोडी ४.७६ टक्क्यांनी मजबूत झाली. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय समकक्षांच्या अनुशंगाने यूरोआयएनआर (EURINR) जोडीत याच कालावधीत ३ टक्क्यांची घट दिसून आली. दरम्यान, त्याच काळात डॉलरच्या निर्देशांकात ४.२ टक्क्यांची घट दिसून आली. तथापि, प्रमुख युरोपियन अर्थव्यवस्थांमध्ये कोरोना विषाणूच्या  वाढत्या घटनांमुळे युरोवर दबाव निर्माण झाला आहे. याबद्दल अधिक माहिती देताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विश्लेषक श्री वकारजावेद खान. 

युरोपमध्ये स्पेन आणि फ्रान्स हे नवे हॉटस्पॉट बनले: युरोपियन युनियनच्या बहुतांश भागात कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेमुळे आधीच आधीच आर्थिक अंदाज घसरणीचा दर्शवत आहेत. युरोपमध्ये एकूण ६.३ दशलक्षाहून अधिक रुग्णांची नोंद आहे. स्पेनने सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच सुमारे ९५०० आणि फ्रान्सने दररोज सुमारे १४,००० रुग्णांची नोंद केली आहे. स्पेन आणि फ्रान्सच्या काही भागांत अंशत: लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे २०२० च्या चौथ्या तिमाहीत आर्थिक सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ स्पेनने २०२० मध्ये अर्थव्यवस्था १०.५ टक्क्यांनी आकुंचन पावण्याचे संकेत दिले असून हे प्रमाण १२.६ टक्क्यांपर्यंत घसरू शकते. २०२० मध्ये फ्रान्सचा जीडीपीदेखील ९ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे.

पीईपीपीचा भर कमकुवत युरोपियन युनियनला मदत करण्यावर कायम: ईसीबीच्या नुकत्याच झालेल्या चलनविषयक बैठकीत, समितीने व्याजादरात कोणतेही बदल करणार नसल्याचे तसेच तसेच ब्लॉकमधील साथग्रस्त देशांसाठी प्रोत्साहनपर पॅकेज निश्चित केले. साथीमुळे निर्माण झालेल्या मंदीनंतर ब्लॉकमधील आर्थिक सुधारणेसाठी मोठी मदत करणे सुरूच ठेवावे, अशी मागणी क्रिस्टीन लिगार्ड यांनी वित्तधोरण निर्मात्यांकडे केली.

तथापि, या वर्षातील कर्जाची पातळी जीडीपीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढत असतावा, बेरोजगारी आणि उत्पन्न योजना अचानक थांबू शकतील असा धोका आहे. त्यामुळे सरकार आणखी पाठबळ आणि अनुदानित योजना देऊ शकेल का, याविषयी चिंता वाढत आहेत.

आर्थिक सुधारणांचे असंख्य प्रयत्न करूनही युरोपमधील उपाययोजना अपु-या, अनिश्चित दिसून येत आहेत. सेंट्रल बँकेनुसार, कोव्हिड१९ च्या घटनांमुळे खात्यांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

आऊटलुक: अमेरिकेतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या ५०,००० एवढ्या शिखरापर्यंत पोहोचून एकदमच कमी होऊन ३०,००० पर्यंत आली. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ही संख्या पुन्हा वाढू लागली आणि पुन्हा रुग्णांनी ५०,००० चा आकडा गाठला आहे. विषाणूची दुसरी लाट येण्याचा असाच प्रकार युरोपच्या बहुतांश भागात विशेषत: स्पेन आणि फ्रान्समध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, यूएस फेडने अल्ट्रा-लूझ चलन धोरणाने अर्थव्यवस्थेला आधार दिला असला तरी अमेरिकी नागरिक आणि अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी आणखी वित्तीय मदतीची तीव्र गरज आहे. २०२३ पर्यंत शून्य व्याजदर असतील, असे यूएसफेडने नुकत्याच झालेल्या चलनविषयक बैठकीत स्पष्ट केले. तसेच ईसीबीच्या धोरणातही हेच चित्र आहे.

दरम्यान, साथ सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या १० वर्षांतील ट्रेझरी उत्पन्नाचे प्रमाण घटत आहे. तसेच जागतिक आर्थिक सुधारणांबाबत गुंतवणुकदारदेखील सावध आहेत. अमेरिकेचे १० वर्षांचे उत्पन्न फेब्रुवारीमध्ये १.६८४ टक्के होते, ते घसरून सप्टेंबर २०२० मध्ये ०.७१५ पर्यंत पोहोचले. ऑगस्ट २०२० पासून युरोयुएसडीचे मूल्य ५ टक्क्यांनी वाढले आङे. केंद्रीय बँकर्सदेखील यावर लक्ष ठेवून आहेत. तथापि, अमेरिका सरकारच्या आर्थिक मदतीच्या आशेने पुढील महिन्यात यातील वाढीबाबत खबरदारी घेतली जाईल. तथापि, युरोआयएनआर (सीएमपी: 86) चे मूल्य ८५ अंकांवरून आणखी खाली घसरण्याची चिन्हे आहेत. तसेच नोव्हेंबर २०२० मध्ये ते ८७ अंकांची उच्चांकी स्थिती गाठू शकते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya