आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले नुतन पोलीस अधिक्षकांचे स्वागत

 

अजय बन्सल यांचे स्वागत करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी अनिल देसाई, राजू भोसले, अविनाश कदम, विक‘म पवार

स्थैर्य, सातारा, दि.१५:
सातारा हा शूरविरांचा जिल्हा असून अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी आपली भावना व्यक्त केली. सातारकरांच्यावतीने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बन्सल यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 

नूतन पोलीस अधिक्षक बन्सल यांनी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पोलीस मु‘यालयात जावून बन्सल यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकर आणि तमाम जिल्हावासियांच्यावतीने बन्सल यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, अनिल देसाई, नगरसेवक अविनाश कदम, बाजार समितीचे चेअरमन विक‘म पवार आदी उपस्थित होते. 

सातारकर हे शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील जनताही शांत आणि संयमी आहे. तमाम जिल्हावासियांचे पोलीस प्रशासनाला नेमहीच सहकार्य असते आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वचजण पोलीस प्रशासनाला मदत करत असतात असे सांगून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात जनतेच्यावतीने नूतन एस.पी. बन्सल यांचे स्वागत केले. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. या शांतताप्रिय जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवतानाच सुशासन आणि लोकाभिमुख कामकाज करु आणि जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरवू, असे आश्‍वासन बन्सल यांनी यावेळी दिले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya