जीप व दोन दुचाक्या अश्या तीन लाख बारा हजार रुपये किमतीच्या वाहनांची चोरी

 

स्थैर्य, खंडाळा, दि.११: शिरवळ ता.खंडाळा येथील दोन ठिकाणाहून चोरट्यांनी जीप व दोन दुचाक्या असा तीन लाख बारा हजार रुपये किमतीची वाहने चोरुन नेल्या आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी सुनील तळेकर यांच्या मालकीची पिकअप जीप क्र. (एमएच-११-बीएच-५८८१) हि किरण विठ्ठल मरगजे हे चालविण्याकरीता आहे.शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान किरण मरगजे यांनी पिकअप जीप हि महामार्गालगत नेहमीप्रमाणे लावली होती. यावेळी आज रविवार दि.11 आँक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता डिझेल पोहोच करण्याचे असल्याने किरण मरगजे हे पिकअप जीप घेण्याकरिता गेले असता त्यांना सदर ठिकाणी २ लाख ५० हजार रुपये किमतीची पिकअप जीप दिसून आली नाही. यावेळी शिरवळ परिसरामध्ये शोधाशोध केली असता पिकअप जीप नसल्याचे आढळून आले. 

याबाबतची फिर्याद किरण मरगजे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये अज्ञात चोरटयांनी शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये पार्किंग मध्ये लावलेली योगेश दत्तात्रय लोले यांच्या मालकीची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एमए-१५-एफपी-१२५४) व दुसऱ्या एका सदनिकेच्या प्रतीक दत्तात्रय नवले यांच्या मालकीची बत्तीस हजार रुपये किमतीची दुचाकी क्र. (एमएच-४५-एक्स८४५) हि चोरून घेऊन गेल्या आहे. याबाबतची फिर्याद योगेश लोले यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार संजय पंडित हे करीत आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya