233 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 247 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 


स्थैर्य, सातारा दि.१४: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 233 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 247 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

247 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 5, कराड येथील 14, फलटण येथील 11, कोरेगांव येथील 21, वाई येथील 21, खंडाळा येथील 15, रायगांव येथील 49, पानमळेवाडी येथील 3, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 20, तळमावले येथील 10, म्हसवड येथील 7, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 45 असे एकूण 247 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


एकूण नमुने - 217007

एकूण बाधित -48620  

घरी सोडण्यात आलेले - 44619  

मृत्यू - 1634

उपचारार्थ रुग्ण- 2367