८६ हजार वीज कामगार बोनससाठी संपावर

 

स्थैर्य, मुंबई, दि.१३: प्रधान ऊर्जा सचिव असिम गुप्ता व तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत कामगार संघटनाची बोनसबाबतची चर्चा फिसकटल्याने १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वीज कंपन्यातील ८६ हजार वीज कामगार संपावर जाणार आहेत. तिन्ही वीज कंपनीतील कार्यरत कामगार, अभियंते, अधिकारी संघटना बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विघुत मंडळातील विभाजित महानिर्मिती/महापारेषण व महावितरण कंपन्यात कार्यरत ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी याचे नेतृत्व करणा-या संघटनाची १२ नोव्हेंबर रोजी असिम गुप्ता व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत चर्चा झाली. मात्र चर्चेत तोडगा निघालेला नाही. 

महामारी, निसर्ग वादळ व महापुरात जोखीम पत्करुन कामगार, अभियंते व अधिकारी यांनी काम केलेले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी बोनस द्यावे, अशी मागणी होत आहे. मात्र सरकार व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन बोनस देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे संप करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya