मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा कॅनॉलमध्ये पडून मृत्यू


स्थैर्य, सातारा, दि.२२: सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा कॅनॉलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोनगाव निंब, ता. सातारा येथे घडली. वंदना सूर्यकांत शिंदे (वय 45 रा. सोनगाव निंब, ता. सातारा) असे कॅनॉल मध्ये बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वंदना शिंदे या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या. मात्र बराच वेळ झाला तरी त्या घरी न आल्यामुळे घरातल्यांनी शोधाशोध केली असता सोनगाव निंब, ता सातारा गावच्या हद्दीत असणार्‍या कॅनॉलच्या कडेला चपला निदर्शनास आल्या. त्यामुळे शोधाशोध केली असता कॅनॉलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.