दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे 85 व्या वर्षी निधन

 

स्थैर्य, दि.१५: दिग्गज बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन झाले. 85 वर्षीय सौमित्र यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील एक महिन्यापासून कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरू होता. शनिवारी हॉस्पीटलकडून जारी केलेल्या बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.

कोरोना झाला, नंतर ठीक झाले

सौमित्र यांना 6 ऑक्टोबरला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. यानंतर 15 ऑक्टोबरला त्यांनी कोरोनावर मात केली. चॅटर्जी यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका सीरीजची शूटिंग पूर्ण केली होती आणि ते सध्या परमब्रत चट्टोपाध्याय यांच्या 'अभिज्ञान' या चित्रपटाची शूटिंग करत होते. याशिवाय ते आपल्या बायोपिक आणि डॉक्युमेंट्रीवरही काम करत होते.

सत्यजीत रे यांच्यासोबत 14 चित्रपटात काम केले

सौमित्र चॅटर्जीं यांना विशेषतः ऑस्कर विनिंग डायरेक्टर सत्यजीत रे यांच्यासोबत केलेल्या कामामुळे ओळखले जाते. दोघांनी सोबत 14 बंगाली चित्रपटात काम केले. यात 'अपुर संसार', 'देवी', 'तीन कन्या', 'अभिजन', 'चारुलता', 'कुपुरुष', 'अरंयेर दिन रात्रि', 'अशनी संकेत', 'सोनार केला', 'जोय बाबा फेलुनाथ', 'हीरक राजार देशे', 'घरे बैरे', 'गणशत्रु' और 'शाखा प्रोशाखा' या आहेत. यासोबतच चॅटर्जींनी आपल्या करियरमध्ये 100 चित्रपाट काम केले, यात 'निरुपमा' आणि 'हिंदुस्तानी सिपाही'चा समावेश आहे. यासोबतच त्यांनी त्यांनी हिंदीत 'स्त्री का पत्र' नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

हे मोठे सन्मान त्यांना मिळाले

2012 मध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा सर्वात मोठा आणि प्रतिष्ठीत दादा साहेब फाळके पुरस्कार मिळाला.

तीन वेळेस नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला.

2004 मध्ये भारत सरकारने सौमित्र यांचा पद्मभूषणने सन्मान केला होता.