एडवॉयने यूके आणि न्यूझीलंडमध्ये विद्यापीठाशी करार केला

 

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२०: भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाची संधी अधिक विस्तारण्याकरिता इंटरनॅशनल स्टडीसाठी यूके-बेस्ड एआय-संचलित एज्युकेशन कंसल्टन्सी प्लॅटफॉर्म एडवॉयने आता न्यूझीलंडमध्येही प्रवेश केला आहे. विदेशात डिजिटल स्टडी अब्रॉड प्लॅटफॉर्मने न्यूझीलंडची युनिव्हर्सिटी ऑफ व्हिक्टोरिया, वेलिंग्टनसह भागीदारीची घोषणा केली. क्यूएस वर्ल्ड रँकिंग-२१ नुसार हे विद्यापीठ जगातील शीर्ष ५०० विद्यापीठांमध्ये २२३ व्या स्थानी आहे. या विस्तारासह विद्यार्थी आता ब्रिटन, आयर्लंड, अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंडच्या टॉप विद्यापीठांमध्ये एआय-संचलित स्टडी अब्रॉड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.

एडवॉयचे सीईओ सादिक बाशा म्हणाले, “न्यूझीलंडमध्ये आमचा विस्तार आणि युकेमध्ये अनेक प्रसिद्ध विद्यापीठांशी भागीदारी झाल्यानंतर एडवॉयला इंटरनॅशनल स्टुडंट मार्केटमध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल. त्यांना अधिक चांगले निर्णय घेण्यासाठीही उपयोग होईल. एडव्हॉयमध्ये विद्यार्थ्यांच्या विदेशात शिक्षणाच्या गरजा समजण्याचा आमचा उद्देश आहे. आमच्या एआय-संचलित डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही या उत्साही विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदात्यांशी जोडून त्यांना त्यांच्या आवडत्या विद्यापीठांचे मार्गदर्शन घेण्यास सक्षम करतो.”

एडवॉय हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून तो विद्यार्थ्यांना स्वत:साठी योग्य अभ्यासक्रमावर संशोधन करणे, स्कॉलरशिप पर्याय पाहणे, हव्या असलेल्या देशात शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञान आणि रिअल लाइफ सल्लागारांचा वापर करतो. या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणाहून जगातील अनेक देशांमधील अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येतो. तसेच अर्जप्रक्रियाही सुलभ होते. अर्जप्रक्रियेसह एआय-संचलित डिजिटल प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना निवास, आरोग्य विमा आणि विद्यापीठापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतो.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya