बिहारमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून कार्यकर्त्यांना संबोधित करणार

 

स्थैर्य,दि ११: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला 74 जागांवर विजय मिळाला आहे. या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खुष आहेत. यानिमित्त बुधवारी संध्याकाली मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून कार्यकर्तांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर भाजप पार्लियामेंट्री बोर्डाची बैठक होईल आणि यात बिहारमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चा होईल.

बैठकीत बिहारमधून सुशील कुमार मोदी, नित्यानंद राय, संजय जायसवाल, गिरिराज सिंह, भूपेंद्र यादव आणि देवेंद्र फडणवीस सामील होतील. बिहार निवडणुकीनंतर राज्यात भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. नीतीश कुमार यांच्या जदयूला फक्त 43 जागांवर विजय मिळाला आहे. आतापर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या जडीयूतून नीतीश कुमार मुख्यमंत्री राहिले आहेत. पण, या निकालानंतर बिहारमधील समीकरणे बदलू शकतात.