शिवथरमध्ये विळ्याने मारहाण 

 


स्थैर्य, सातारा, दि.२२: शेतात काम करण्यास गेलेल्या दाम्पत्याला पुन्हा शेतात पाय ठेवायचे नाही असे म्हणत दमदाटी करून व हाताने विळ्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत मारुती माने, अमोल चंद्रकांत माने व उषा चंद्रकांत माने सर्व रा. शिवथर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सदाशिव हरी बल्लाळ हे पत्नीसह शिवथर गावच्या हद्दीतील कोळ्याचा पट नावच्या शिवारात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. यावेळी संशयीतांनी दमदाटी करत या क्षेत्रात पाय ठेवायचा नाही, असे म्हणत दमदाटी केली. तसेच फिर्यादीची पत्नी भांडणे सोडवण्यास आली असता तिला निशा चंद्रकांत माने हिने हाताने मारहाण केली. अमोल चंद्रकांत माने याने विळ्याने फिर्यादीच्या गुडघ्यावर मारून जखमी केले.