दहा लाखांसाठी विवाहितेचा छळपतीसह तिघांवर गुन्हा

 

स्थैर्य, सातारा, दि.२०: माहेरवरून दहा लाख रुपये आण म्हणून विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती प्रसाद सुभाष जगताप, सासू बेबीनंदा प्रसाद जगताप (दोघे रा. गोडोली,सातारा), नणंद पौर्णिमा संतोष क्षीरसागर (रा. राजवाडा,सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत प्रिया प्रसाद जगताप (रा.गोडोली,सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रिया यांच्या वडीलांनी त्यांच्या लग्नात व त्यांच्या मुलीच्या बारशात असे मिळून दहा तोळे सोन्याचे दागिने घातले होते. ते दागिने संशयितांनी काढून घेतले व शिवीगाळ, मारहाण केली होती. त्यानंतर एका महिलेला उसनवारी म्हणून दिलेल्या पैशाच्या कारणातून त्यांचा सतत छळ करून सतत टोचून बोलत होते. तसेच पती प्रसाद याने तू मला आवडत नाहीस”,असे म्हणून मारहाण करून माहेरवरून दहा लाख रुपये आणावेत असा तगादा लावला. पैसे आणले नाहीत तर घरातून निघून जा”,असे म्हणून संशयितांनी मारहाण केल्याचे विवाहिता प्रिया जगताप यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.