LOC वर फायरिंग : BSF आणि आर्मीचे 4 जवान शहीद, तर 3 नागरिकांचा मृत्यू; प्रत्युत्तरात पाकचे 3 कमांडो आणि 5 सैनिक ठार

 

स्थैर्य, दि.१३: पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये BSF आणि आर्मीचे 4 जवान शहीद झाले, तर 4 नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात पाकिस्तानीचे 3 कमांडो आणि 5 जवानांना ठार केले. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या पुंछ, केरन, गुरेज सेक्टरमध्ये सीजफायर वॉयलेशन केले. कुपवाडापासून बारामूलापर्यंत पाकिस्तानी सैन्याने फायरिंग केली. या आठवड्यात दुसऱ्यांना पाकने गोळीबार केला आहे.

पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये बारामूला सेक्टरमध्ये BSF चे सब-इंस्पेक्टर राकेश डोभाल शहीद झाले. राकेश डोभाल उत्तराखंडच्या ऋषिकेश जिल्ह्यातील गंगानगरचे रहिवासी होते. उडी सेक्टरमध्ये 2 सैन्य जवान आणि गुरेज सेक्टरमध्येही एक जवान शहीद झाला. याशिवाय फायरिंगमध्ये 3 नागरिकदेखील वेगवेगळ्या ठिकाणी ठार झाले.

पाकिस्तानी बंकर आणि लॉन्च पॅड उडवले

प्रत्यात्तरात भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी बंकर उडवले. यासोबतच फ्यूल डम्प आणि लॉन्च पॅडदेखील उद्धवस्त केले. यात अंदाजे 12 पाकिस्तानी सैनिक जखमी झाले.

BSF चे सब इंस्पेक्टर राकेश डोभाल उत्तराखंडचे ऋषिकेश जिल्ह्याच्या गंगानगर येथे राहणारे होते.


दरम्यान, कर्नल राजेश कालियांनी सांगितले की, आज LOC येथील केरन सेक्टरमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या. यानंतरही सर्व जवानांना अलर्ट करण्यात आले होते. दरम्यान पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याने याचे उत्तर दिले.