कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रथमच अजित पवार मंत्रालयात

 

स्थैर्य, मुंबई, दि.१०: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मंत्रालयात हजेरी लावत कामकाजाला सुरुवात केली आहे. कोरोनानंतर अजित पवार पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेसबूक लाईव्ह करत ही माहिती दिली आहे. अजित पवार कोरोनामुक्त झाले होते त्यावेळी देखील सुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअ‍ॅप स्टेटस ठेवत सर्वांचे आभार मानले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त 2 नोव्हेंबरला कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 7 दिवस आराम केल्यानंतर अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya