एनकूळ येथील किल्ले स्पर्धेस चांगला प्रतिसाद

एनकूळ :  पारितोषिक वितरण करताना  मकबुल मुल्ला, धनंजय क्षीरसागर, नवनाथ खरमाटे आदी (छाया : समीर तांबोळी)

स्थैर्य, कातरखटाव, दि.२१: एनकूळ (ता. खटाव) येथील युवक मित्र मंडळाने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेस लहान मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत शुभम विकास खरमाटे, स्वराज्य श्रीमंत ओंबासे, पियुष संतोष चव्हाण, ओम विश्वास चव्हाण, नागेश आनंदा कुंभार या विद्यार्थ्यांनी पहिले पाच क्रमांक पटकावले. त्यांना स्वरा उद्योग समुहाचे संस्थापक राजेंद्र खाडे, अजित खरमाटे, मल्हारी खरमाटे, शिवाजी हांगे, नवनाथ खरमाटे, महेश खरमाटे यांच्या वतीने अनुक्रमे 2 हजार 500, 2 हजार, 1 हजार, 500 रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली.

निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मगबुल मुल्ला, येरळा परिवाराचे संस्थापक धनंजय क्षीरसागर, धनाजी चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील रमेश पाटील, सचिन शिंदे यांची मनोगते झाली. निवृत्त फौजी जवान हिंदुराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. नाथा खरमाटे यांनी सुत्रसंचालन तर गणेश पाटील यांनी आभार मानले.