स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


स्थैर्य, सातारा दि.१९ : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.