पदवीधर मतदानासाठी एक डिसेंबरला सुटी, निवडणूक अधिकारी बोरकरांची माहिती

 


स्थैर्य, सातारा, दि.१३ : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान एक डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी संबंधितांना विशेष नैमित्तिक रजा देण्यात यावी, अशी सूचना उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी केली आहे. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे व्यतिरिक्त असणार आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले आहे.