तालुक्यातील ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्त्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक

 

स्थैर्य, फलटण, दि.२१ : फलटण शहर व तालुक्यातील ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दि. 22 रोजी सकाळी 11.00 वाजता अक्षदा मंगल कार्यालय, तावडी फाटा, ठाकुरकी ता. फलटण येथे आयोजित करण्यात येत असून संबंधीतांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केले आहे.