कराड भूमीअभिलेक कार्यालयातील परिरक्षण भूमापक व खाजगी मदतनीस10 हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपतच्या जाळयात रंगेहाथ

 

स्थैर्य, कराड, दि.१२: वारसदारांची नोंद करून देण्यासाठी 13 हजार  रूपयांच्या लाचेची मागणी करत 10 हजार रूपयाची लाच स्विकारताना परिरक्षण भूमापक,  व त्याचा खाजगी मदतनीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले.  वैभव चंद्रकांत पाटील, रा.फ्लॅट नंबर 101,साई रेसिडेन्सी, मलकापूर, कराड, परिरक्षण भूमापक, व त्यांचा खाजगी मदतनीस संजय माने, रा. वाघेरी ता. कराड जि. सातारा  यांस लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. वारसा नोंदी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात सुरू असलेली खाबू गिरी चव्हाट्यावर आणण्याचे काम लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे.  

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार यांचे चुलत चुलते यांचे सर्व्हे नंबर 61 ब, व 61 क, शनिवार पेठ, कराड या मिळकतीवर वारसदारांची नोंद करून देण्यासाठी तेरा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार  उपअधीक्षक अशोक शिर्के  व  त्यांच्या पथकाने पडताळणी करत कराड भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला व दिनांक 11 नोव्हेबर रोजी कराड कार्यालयात  13 हजार रुपयांची लाचेची मागणी करून  तडजोडी अंती 10 हजार  रूपये स्विकारनार्‍या परिरक्षण भूमापक व त्याच्या मदतनीसास  रंगेहाथ पकडले. पुढील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सुरू आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पूणे चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपतचे उपअधीक्षक अशोक शिर्के, पो.हवा.संजय साळूंखे, पो. ना. प्रशांत ताटे, पो.कॉ.संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले लाप्रवि, सातारा युनिट यांनी सहभाग घेतला.