चला बालदिनाची मजा लुटायला! कोयना धरणासह नेहरू उद्यान पर्यटकांसाठी खुले

 स्थैर्य,कोयनानगर, दि १४: पर्यटनस्थळांवरील बंदी जिल्हा प्रशासनाने उठवल्यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले येथील कोयना धरण व नेहरू उद्यान पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर जन्मदिवस हा देशभरात बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंडित नेहरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कोयना प्रकल्पाने लाखो रुपये खर्च करून नयनरम्य असे नेहरू स्मृती उद्यान उभे केले आहे.

पाटण तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून दहा वर्षांपासून उद्यानात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच्या महामारीमुळे बंद असणाऱ्या नेहरू उद्यानामुळे बालदिनच्या अनिश्‍चितेच्या फेऱ्यात अडकला होता. पर्यटन क्षेत्रावरील बंदी उठल्यामुळे बालदिनाचा कार्यक्रम कोयना परिवाराने आयोजित केला आहे.