महाबळेश्वर, पांचगणीतील गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

 


स्थैर्य, महाबळेश्वर, दि.१९: बाजारपेठा, हाॅटेल, रेस्टाॅरंट व मंदिर सुरू झाल्याने लोक आता मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत, परंतु या गर्दीत शिस्त पाळली जात नाही. मला काही होणार नाही असे आता लोकांनी गृहीत धरले आहे. गर्दीत स्वयंशिस्त आवश्यक आहे, अन्यथा ही गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते. म्हणून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, दिल्ली व केरळ येथे रूग्ण वाढू लागले आहेत. युके, फ्रान्समध्ये लाॅकडाउन लागू करण्यात आला आहे. अमेरिकाही अडचणीत आहे, म्हणून सध्या आपल्या पुढे अडचणी वाढू नये यासाठी लोकांनी शिस्त पाळली पाहिजे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.