दिवाळीला एक दिवा सीमेवरील जवानांसाठी लावा : मोदी

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: या दिवाळीला एक दिवा आपल्या सैन्य दलातील जवानांसाठी लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. देशातील जनतेने जवानांना एक सलाम म्हणून हे दिवे लावावे.पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘या दिवाळीला आपण सैन्य दलातील जवानांना सलामी देण्यासाठी एक दिवा लावावा. जवान निर्भीड होऊन देशाची सेवा करतात. आमचे शब्द सैन्य दलातील जवानांच्या साहसासाठी त्यांच्या प्रती आभाराची भावनेसोबत न्याय नाही करु शकत. आम्ही सीमेवरील जवानांच्या परिवाराच्या प्रती आभारी आहोत.’

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीला भारतीय जवानांची भेट घेतात. यावषीर्ही त्यांनी देशाच्या सैन्य दलातील जवानांसाठी एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे.तर तेच दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, दिवाळी भारतीय समाजाच्या एकीचे उदाहरण आहे. दरम्यान, दिवाळीच्या या मंगलमयी मुहूर्तावर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya