राष्ट्रवादीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची फलटण तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

 

स्थैर्य, फलटण, दि.१४ : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची फलटण  तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचीत सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार दीपक चव्हाण, सांस्कृतिक विभागाचे तालुका अध्यक्ष अमोल देशमुख व शहर अध्यक्ष पृथ्वीराज बर्गे उपस्थित होते. 

नवीन कार्यकारिणीला पूढील वाटचाली साठी श्रीमंत संजीवराजेंनी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे, आमदार शशिकांतजी शिंदे, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, फलटण शहरातील नगरसेवक व सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवरांनी नवीन सदस्यांचे अभिनंदन केले. 

फलटण तालुका कार्यकारणी

गणेश धुमाळ- तालुका उपाध्यक्ष 

अमित तोडकर- तालुका  सरचिटणीस 

मंदार जाधव- तालुका सहसचिव 

अविनाश अब्दागिरे- तालूका संघटक 

फलटण शहर कार्यकारणी
 
रवीराज ढेंबरे- शहर उपाध्यक्ष 

सूर्याजीत इंगळे- शहर सरचिटणीस 

अमोल अहेरराव- शहर प्रसिद्धी प्रमुख 

जितेंद्र कुंभार- शहर सहसचिव 

हर्षद कदम- शहर संघटक
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya