सुनिता महामुनी यांना नवदुर्गा पुरस्कार

 

सुनिता महामुनी यांचा सत्कार करताना  शशिकला देशमुख, स्वप्नाली डोईफोडे व मान्यवर.( छाया : समीर तांबोळी )

स्थैर्य, कातरखटाव, दि.२१: सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील श्री गणेश महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुनिता दिलीप महामुनी (सुतार) यांना कुंभारगांव (ता. पाटण) येथील विश्वकर्मा प्रतिष्ठाण व सुतार समाज महासंघाच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

सुरेश भालेराव, बबनराव सुतार, अधिकराव सुतार, भगवान सुतार, संदिप पोतदार, प्रभाकर दिक्षीत, अनिल सुतार, मोहन सुतार, प्रदिप सुतार, विनायक सुतार, योगेश सुतार, प्रवीण सुतार या मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.

सौ. महामुनी यांच्यासह कराड येथील डॉ. सविता मोहिते, डॉ. जयश्री शेलार, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा स्नेहाताई मेस्त्री, कविता कचरे, मनिषा सुर्यवंशी, रुक्मिणी नागपुरे, वैजयंती कवठेकर, उषा भुमकर आदिंना हा पुरस्कार देण्यात आला. महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. या पुरस्काराबद्दल सौ. महामुनी यांचा येरळा परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदार डॉ. स्वप्नाली डोईफोडे, आगारप्रमुख कुलदिप डुबल, शशिकला देशमुख, प्रभावती देशमुख, सरपंच शितल देशमुख, प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, प्राचार्य आनंदराव नांगरे,माजी सरपंच राजेंद्र फडतरे,जेष्ठ पत्रकार दिपक तंडेबडवे, आबासाहेब जाधव, विजय शिंदे, सारथी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद गोसावी, डॉ. सुजित ननावरे, संतोष पाटोळे, वरुड सोसायटीच्या चेअरमन कल्याणी माने, सरपंच वैशाली माने, रघुनाथ फडतरे, निलेश पांचाळ, कुमार शेटे, गजानन कुंभार, समीर तांबोळी धनंजय चिंचकर, प्रतापराव माने, जे. के. काळे, नितीन जगदाळे, अदिरुध्द लावंगरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. शरद कदम यांनी सुत्रसंचालन केले. धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले. यावेळी दिपक तंडेबडे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya