सोमर्डी येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा नऊ जण ताब्यात; २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

 


स्थैर्य, सातारा, दि.१२: जावळी तालुक्यातील सोमर्डी येथे एका घरामध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, तीन दुचाकी असा सुमारे २ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रकांत विष्णू सोनवणे (वय ४९, रा, सोमर्डी ता. जावळी), आनंदराव बाबुराव जवळ (वय ५०, रा. जवळवाडी, ता. जावळी), संतोष चंद्रकांत वारागडे (वय ४८, रा. मेढा ता. जावळी), प्रमोद दत्तात्रय खटावकर (वय ४८, रा. कुडाळ, ता. जावळी), अशोक सोपान चिकणे (वय ४९, रा. खंडाळा कन्हेरी, ता. खंडाळा), गणेश दगडू साळवी (वय ३९, रा. धनकवडी बालाजीनगर पुणे), राजू विश्वनाथ मंडल (वय ३८, रा. बालाजी नगर पुणे), रुपेश तुकाराम साबळे (वय ४२, रा. शिवथर, ता सातारा), दिलीप काशिनाथ कुंभार (वय ५३, रा. कुंभारवाढा मेढा, ता. जावळी) अशी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सोमर्डी येथे एका घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी येथे जाऊन संबंधित घरांमध्ये छापा टाकला. त्यावेळी ९ जण तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनसिंग साबळे, हवालदार तानाजी माने, सतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, प्रवीण कांबळे तसेच मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, संजय ओव्हाळ, गजानन तोडकर यांनी केली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya