नितीश कुमार यांनी 7 व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तारकिशोर प्रसाद आणि रेणु देवी यांनाही संधी

 

स्थैर्य, दि.१७: नितीश कुमार यांनी आज राजभवनात 7 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यादरम्यान गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. नितीश यांच्यासोबतच 4 वेळेसचे आमदार तारकिशोर प्रसाद यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच उपमुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या दावेदार रेणु देवी यांनाही गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

यांनी घेतली शपथ

  • यांनी घेतली शपथ पक्ष तारकिशोर भाजप रेणु देवी भाजप विजय चौधरी जदयू बिजेंद्र यादव जदयू अशोक चौधरी जदयू मेवालाल चौधरी जदयू शीला कुमारी जदयू संतोष मांझी हम मुकेश सहनी VIP मंगल पांडेय भाजप अमरेंद्र प्रताप सिंह भाजप रामप्रीत पासवान भाजप जीवेश मिश्रा भाजप

शपथविधीला तेजस्वी आले नाही

राजद नेते तेजस्वी यादव नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला येणार नाहीत. भास्करच्या रिपोर्टनुसार, तेजस्वी दोन दिवसांपासून घरातून बाहेर आले नाहीत. तेजस्वी यांनी पराभव स्विकारला नाही. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी ते दिल्लीतील जानकारांचा सल्ला घेत आहेत. म्हणुनच, महाआघाडी (राजद, काँग्रेस, वाम दल)ने शपथविधी सोहळ्याचा बायकॉट केला आहे. तिकडे, लोजपाला या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले नाही. त्यामुळेच, चिराग पासवान आणि त्यांच्या पक्षाचा एकमेव आमदार शपथविधीला जाणार नाही.