माझेरी (पुनर्वसन) जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचे राज्य गुणवत्ता यादीत स्थान

 


स्थैर्य, फलटण दि.१५: जिल्हा परिषद प्रा. शाळा माझेरी (पुनर्वसन) ता. फलटण येथील इयत्ता 5 वी चे 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत चमकले असून दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी माझेरी (पुनर्वसन) जिल्हा परिषद प्रा. शाळेचे आहेत.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये विश्‍वराज गणेश पोमणे (266) आणि विश्‍वजित देवराज मदने (264) हे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले आहेत, तर अनुराग अजित शिंदे (262), जय शरद शिंदे (258), कु.समृद्धी सत्यवान नाळे (256), विश्वनील सचिन महामुनी (250), कु.श्रावणी नितीन फरांदे (244), कु.रोशनी संजय नाळे(244), निरंजन बाळासाहेब पानसरे (242), ओंकार बाबासो नाळे (242), कु.वेदिका संदिप भोसले (240), ओम राहुल कोकरे (238), दिव्यम सचिन लंगुटे (234), कु.श्रावणी सुरेश नाळे (232), रणजित विजय निंबाळकर (232), कु.सिद्धी किरण धर्माधिकारी (230), श्रेयस धनाजी नेरकर (228), प्रणव नवनाथ लोखंडे (226), गौरव महादेव जगताप (226) या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावापुढे कंसात नमूद गुण मिळविले आहेत.

माझेरी (पुनर्वसन) ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेचे सन 2020 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत 36 पैकी 19 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून यावर्षी शाळेतील 4 विद्यार्थ्यांची सैनिक स्कूल साठी, 3 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे.

माझेरी (पुनर्वसन) ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेतून सन 2017 मध्ये 16 पैकी 13, 2018 मध्ये 19 पैकी 14, 2019 मध्ये 24 पैकी 12 व वर्ष 2020 36 पैकी 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले असून 4 वर्षात शाळेचे एकूण 57 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात माझेरी(पुनर्वसन) प्रा. शाळेने गुणवत्तेचा ग्रामीण भागातून आपला आलेख चढता ठेवला असून यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक व पालक यांचा वाटा आहे. महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, श्रीराम कारखाना चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, शिक्षणविस्तार अधिकारी मठपती यांचेसह मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.