शहरातील रस्ते दुरुस्त करा : समशेरसिंह नाईक निंबाळकर

 


स्थैर्य, फलटण, दि.९: नगर परिषद हद्दीत मलनिस्सारण (भुयारी गटर) योजना कामाचे पाईप लाईनचे काम शहरात सुरु असून सर्व भागातील रस्ते पाईप लाईन टाकणेसाठी उकरलेले आहेत उकरलेले रस्तेचे डांबरीकरण न केल्याने मोठे खड्डे पडले आहेत वाहनचालक जखमी होत आहेत रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नगरपालिकेसमोर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय बेमुदत उपोषन सुरू करण्यात आले आहे

नगरपालिकेसमोर धरणे आंदोलनामध्ये नगरपालिकेत विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते व नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन सुर्यवंशी (बेडके), सचिन अहिवळे,अनुप शहा,महेंद्र सुर्यवंशी (बेडके), डॉ सुभाष गुळवे,भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, राजेश शिंदे, डॉ. प्रविण आगवणे, पंकज पवार,तुकाराम शिंदे, नगरसेविका मदलसा कुंभार, मिना नेवसे, मंगलादेवी नाईक निंबाळकर, ज्योती खरात, मंगेश आगवणे, वसीम मनेर,लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, सादीक कुरेशी, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली फलटण शहरात भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले असून शहराच्या विविध पेठा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खुदाई चालू करण्यात आली आहे. त्याचा प्रचंड त्रास पादचारी व वाहतूकदार आणि व्यापार्‍यांना होत आहे. रस्ता खुदाई केल्यानंतर व काम वेळेत पूर्ण होताच रस्त्याचे पॅच वर्क करण्याची जबाबदारी ठेकेदार लक्ष्मी इंजिनीअरिंग कंपनीची असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही, उलट दोन वर्षापूर्वीपासून खोदलेल्या रस्त्यांचे पॅच वर्कही झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील खोदण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचे पॅच वर्क तात्काळ झाले पाहिज अन्यथा जोपर्यंत रस्तंची कामे सुरु होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनास खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला खा रणजितसिंह यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याशी चर्चा करून ज्या भागात रस्ते मंजूर नाही तेथील सर्वेक्षण करून निधी मंजूर करावा आणि मगच भुयारी गटार योजनेचे काम सुरू करावे जेथे रस्ते मंजूर आहेत तेथे तातडीने डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी शहरात 15 कोटी रु रस्त्यांच्या डाँबरीकर्णासाठी मंजूर झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची निविदा मंजूर होताच काम सुरू होणार आहे जे रस्ते मंजूर झालेले नाही त्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून डांबरीकरण दिवाळी नंतर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रसाद काटकर यांनी सांगितले.

जनतेची गैरसोय त्वरित दूर न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya