केंद्र व राज्य शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पोस्टमनद्वारे घरपोहच मिळणार हयातीचा दाखला

 


स्थैर्य, सातारा दि.१२: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी आवश्यक असणारा हयातीचा दाखला देण्याबाबत आता पोस्ट विभागाने पुढाकार घेतला असून पोस्टमन थेट घरी जाऊन हा दाखला देणार आहेत त्यामुळे सेवानिवृत्त धारकांची मोठी सोय झाली आहे. 

पोस्टाबरोबर इतर सर्व विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा असेल. ग्रामीण भागातील किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित पेन्शनराने संपर्क केल्यास पोस्टमन घरी जाऊन ही सेवा देतील. यामध्ये पेन्शनरचा आधार क्रमांक, पेन्शन क्रमांक, तसेच बायोमेट्रिक मशीनला अंगठा घेवून हयात दाखला तयार होतो व संबंधित विभागाकडे उपलोड देखील होतो.पोस्ट विभागाने यासाठी एक सुविधा सुरु केली आहे. पोस्ट विभागाकडे पेन्शनर मागणी करतील अशा पेन्शनरांच्या घरी जाऊन पोस्टमन त्यांचा हयातीचा दाखला आधार कार्ड व बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने जागेवरच तयार करणार आहेत. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात किंवा वयोमानानुसार सेवानिवृत्त धारकांना धावपळ करावी लागणार नाही. 

अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस, पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधावा व सातारा जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवर अधिक्षक, सातारा विभाग, सातारा अपराजिता म्रिधा यांनी केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya