मारुतीच्या रुपात सिध्दनाथाचे दर्शन, हरपून गेले भाविकांचे मन!

 


स्थैर्य, कोपर्डे हवेली, दि.२१ : येथील श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखाव्दारे देवाला विविध रुप देऊन पूजा बांधण्यात येते. आज शनिवारचे औचित्य साधून श्री सिध्दनाथ देवाची मारुतीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. आज शनिवारी श्री सिध्दनाथ मारुतीच्या रुपात अवतरल्याने भाविकांना शनिवारी मारुतीचे दर्शन मिळाले.

भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णात गुरव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विविध रुपातील आकर्षक पूजा बांधतात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सर्व युवक, ज्येष्ठ मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. नवरत्न काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya