पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांची वाळू माफियांवर कारवाई....४६,२८००० मुद्देमाल जप्त...

 

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.९: सातारा पोलिस सहाय्यक अधीक्षक आंचल दलाल यांनी सहकाऱ्यांच्या साथीने वाठार स्टेशन पोलिस ठाणे हद्दीतील मळकी नावाच्या शिवारात छापा टाकून अवैध वाळू उपसा करून दोन इसमांना ४६,२८,००० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहीगाव ते घिगेवाडी गावाच्या हद्दीत मळकी नावाच्या शिवारात सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल परिवेक्षाधिन पोलिस अधिक्षक रितु खेाखर यांनी सातारा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेनुसार छापा टाकून वाळू उपसा करणाऱ्या दोन इसमांसह ५० ब्रास वाळू १ पोकलेन २ टृलीसह ट्क्टर १ बोलेरो जीप ,१मोटरसायकल,१ बंपर,१ जे सी बी असा एकून ४६,२८००० रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.संबंधित इसमाविरुद्ध वाठार स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.