वडूज येथे शनिवारी महाविकास आघाडी चा शिक्षक व पदवीधर मतदार मेळावा

 

स्थैर्य, वडूज, दि.१८: महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील शिक्षक आमदार पदाच्या निवडणूका येत्या १ डिसेंबर ला होत असून या पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडी चे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारानिमित्त खटाव तालुक्यातील वडूज येथील अक्षदा मंगल कार्यालयात शनिवारी दि २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३०वाजता शिक्षक व पदवीधर मतदार मेळावा होणार आहे. या मेळाव्यास सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना व मित्र पक्षीय महाविकास आघाडी चे सर्व वरिष्ठ नेते,पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच खटाव तालुक्यातील सर्व महा विकास आघाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले आहे.