एकाच वेळी घरातून बेपत्ता झालेल्या तीन मित्रांचे मृतदेह एकाच झाडाला लटकलेले आढळले

 


स्थैर्य, ठाणे, दि.२१: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या चांदेगावजवळील जंगलात तीन मित्रांचे मृतदेह आढळले आहेत. हे तिघेही एकाच वेळी घरातून बेपत्ता झाले होते. तिघांचे मृतदेह महूच्या झाडाला लटकलेले आढळले. या तिघांची हत्या करुन त्यांना लटकवण्यात आले असल्याचे मानले जात आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट होईल की, ही हत्या आहे की, आत्महत्या. तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, एका जनावरे चारणाऱ्या व्यक्तीने हे मृतदेह पाहिले यानंतर पोलिसांना सूचना दिली. तिघा मित्रांची नावे, नितिन भर्रे(35), महेंद्र धुबेले(28) आणि मुकेश घावत(22) च्या रुपात झाली आहे. पोलिसांनी म्हटले की, धुबेले आणि घावत नात्याने काका आणि पुतनेही आहेत आणि दोघेही चांद गावात राहतात.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही 14 नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी शाहपूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

असा झाला घटनेचा खुलासा
ही घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. जंगलातून जात असलेल्या एका जनावरे चारणाऱ्या व्यक्तीने त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेले पाहिले आणि त्याने स्थानिक लोकांना याची सूचना दिली. यामधून एकाने फोन करुन शाहपूर पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना दिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya