पाहुणे गेल्यानंतर होणाऱ्या तीन मित्रांकडूनच तरुणीवर सामुहिक बलात्कार

 

स्थैर्य, मुंबई, दि..१६: मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टी दरम्यान एका 22 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटना 8 नोव्हेंबरची असून, आता उघडकीस आली आहे. पीडितेचा आरोप आहे की, तिघांनी तिला दारू पाजून गँगरेप केला. तिन्ही आरोपी पीडितेचे चांगले मित्र असल्याची माहिती आहे.

पाहुणे गेल्यानंतर केला बलात्कार

अविनाश पेंगेकर(28), शिशिर(27) आणि तेजस(25)अशी आरोपींची नावे आहेत. अविनाशनेच आपल्या एंगेजमेंट पार्टीत तरुणीला बोलवले होते. तरुणीने आपल्या जबाबात सांगितले की, तिला बळजबरीने दारू पाजण्यात आली. यानंतर पार्टीत बोलावलेल्या इतर दोन महिला निघून गेल्यावर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 376 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya