प्रशिक्षणार्थी मुलांचे मोबाईल चोरून नेलेल्या चोरट्याला अटक व चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त

 

जप्त केलेल्या मुद्देमालासमवेत सपोनि संजय बोंबले व पोलीस कर्मचारी

स्थैर्य, फलटण ता. १३: वाजेगाव (ता.फलटण) गावच्या हद्दीत जय हिंद करीअर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी मुलांचे मोबाईल चोरून नेलेल्या चोरट्याला फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बरड पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस पथकाने पकडुन त्याच्याकडून चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्वरूप उर्फ कौन्या दादासो भोसले वय २३ भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे त्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक दि.०९ /१०/२०२० रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मौजे वाजेगाव ता.फलटण गावचे हद्दीतील जय हिंद करीअर अकॅडमी येथे प्रशिक्षणार्थी मुले राहत आहेत. ते रहात असणा-या पत्र्याचे शेड मध्ये प्रशिक्षणार्थी मुले झोपलेले असताना त्यांचे मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले होते. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदरच्या गुन्ह्याचा तपास  पोलीसांनी गतीमान करून कौन्या भोसलेला भिगवण ता. इंदापुर जि.पुणे येथुन ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल हस्तगत केले आहेत.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५४६/२०२० भा.द.वी.स. कलम ३७९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सातारा अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पोलीस हवालदार कांबळे तसेच बरड पोलीस दुरक्षेत्र येथील अंमलदार व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक काशीद, तुपे, पोलीस शिपाई जगदाळे, पाटोळे, कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.