तरूणांनी व्यवसाय कौशल्य अवगत करणे आवश्यक : राम निंबाळकर

 

स्थैर्य, फलटण, दि. १७ : ग्रामीण भागाची गरज ओळखून तरूणांनी व्यवसाय कौशल्य अवगत करणे आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये बहुतांश सोयी सुविधा पोहचवणे आवश्यक असून आगामी काळामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसाय कौशल्याला अवगत करून व्यवसाय करणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

दिनांक १६ रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाजेगाव, ता. फलटण येथील शिंवशंभु मोटर्स आणि क्रेन सर्विस व माउली कृषी सेवा केंद्र या व्यवसायांचे उद्घाटन उद्योजक राम निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, शिवाजी पिसाळ, कराड अर्बन बँकचे शंकर महानवर, काशिराम मोरे, भानुदास मतकर, स्वप्निल पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.